Posts

Showing posts from August, 2020

मादिगा

  मादिगा-   तैलंगी चांभारांची जात. यांची लोकसंख्या सुमारें २० लाख असून मद्रास, हैदराबाद, म्हैसूर संस्थान यांतून विशेष भरणा आहे. यांचा वडिलोपार्जित धंदा चामडयाचें काम करण्याचा आहे पण आज बहुतेक लोक शेती किंवा मजुरी करतात. यांच्यांत 'बसवी' ची चाल सरसकट दिसून येते. कांहीं लोक वैष्णवपंथी आहेत. पश्चिम चालुक्य घराण्याचा राजा मांगेलेसा (इ. स. ५६७-६१०) यानें मांटागा (मातंग?) लोकांस जिंकलें. याच मांटागा लोकांचे 'मादिगा' जातीचे लोक वंशज असावे.     खंड १८ : बडोदे - मूर